CBSE 10th Result 2022: दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता, कुठे चेक कराल

सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. Cbse.gov.in आणि cbresults.nic.in या वेबसाइटवर गेल्यानंतर होमपेजवर CBSE Class 10 Result या लिंकवर क्लिक करायचे.

नवी दिल्ली, 4 जुलै : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) दहावी परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. यात राज्यातील विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश मिळवलं. आता 4 जुलै 22 म्हणजे आज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) दहावीचा निकाल घोषित केला जाण्याची शक्यता आहे. 24 मे रोजी सीबीएसईकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली असून 21 लाख विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. या संदर्भात ‘टीव्ही नाइन हिंदी’ने वृत्त दिलं आहे.

सीबीएसईच्या दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर (Official Website) cbseresults.nic.in आणि cbse.gov.in वर पाहता येणार आहे. देशभरामध्ये लाखो विद्यार्थी दरवर्षी सीबीएसईतून दहावीची परीक्षा देत असतात. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये निकालाची प्रचंड उत्सुकता असते. यंदा देशभरातील 21 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, आता निकाल लावण्याची मंडळाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

यंदा निकालासाठी का लागला उशीर

सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन गुण (Internal Assessment Marks) वेळेत अपलोड करणं अत्यावश्यक होतं. परंतु, अनेक शाळांनी इंटर्नल गुण अपलोड केले नाहीत. तसंच काही शाळांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांमध्ये त्रुटी असल्याचं म्हटलं होतं. या सर्व तक्रारींचा सीबीएसईकडून तपास करण्यात आला. या प्रक्रियेला वेळ लागल्याने त्याचा परिणाम निकालावर झाला असून यासाठी उशीर लागला आहे. पण आता 4 जुलै रोजी निकाल घोषित करण्यात येईल. याशिवाय सीबीएसई 12वीचा निकाल 10 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

सीबीएसई निकालाचं प्रमाण 30:70 असणार

यंदाच्या वर्षी दोन्ही सत्रांचा निकाल 50:50 मार्किंग स्किमच्या (Marking Scheme) आधारावर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पहिल्या सत्राची परीक्षा होम सेंटरवर झाली होती. त्यामुळे तिथे विद्यार्थ्यांनी गुणांमध्ये फेरफार केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. ही बाब लक्षात घेऊन सीबीएसईने होम सेंटरवर झालेल्या निकालाचं प्रमाण (Ratio) कमी करून 30 टक्के इतकंच केलं आहे. त्यामुळे या वर्षी पहिल्या सत्रातील 30 टक्के आणि दुसऱ्या सत्रातील 70 टक्के असे गुण गृहित धरले जाणार असल्याचं सीबीएसईने स्पष्ट केलं आहे. याच कारणामुळे यंदाच्या वर्षी निकाल लागण्यासाठी उशीर लागला आहे.

निकालानंतर स्कोर कार्ड असे करता येईल डाउनलोड

सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. Cbse.gov.in आणि cbresults.nic.in या वेबसाइटवर गेल्यानंतर होमपेजवर CBSE Class 10 Result या लिंकवर क्लिक करायचे. इथे विद्यार्थ्याचा नोंदणी क्रमांक (Registration Number) व आसन क्रमांक (Roll Number) टाकायचा. त्यानंतर स्क्रीनवर स्कोअर कार्ड पाहता येणार आहे. भविष्यात याचा उपयोग व्हावा म्हणून स्कोअर कार्डची प्रिंट काढून घेता येईल.

दरम्यान, दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला नवं वळण लागत असतं. आपल्या आवडत्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी विद्यार्थी सज्ज होत असतात. त्यामुळे याचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळतं.

CBSE Class 10th Result 2022: आज CBSE 10 वीचा निकाल येण्याची शक्यता, ‘या’ लिंकवर क्लिक करून असा तपासा तुमचा रिझल्ट

नवी दिल्ली: CBSE 10th Results 2022: आज सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10 वी  (CBSE Board Exam)निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE आज अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर इयत्ता 10वीचा निकाल 2022 जाहीर करेल. या वर्षी CBSE ने परिक्षा संगम नावाचे एक नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केलं आहे. ज्याद्वारे विद्यार्थी CBSE टर्म 2 चा निकाल सहज तपासू शकणार आहेत. .

यावर्षी टर्म 2 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in किंवा cbresults.nic.in जाहीर केला जाईल.

तारीख आणि वेळ याची शक्यता आहे. ते बदलण्याची शक्यता आहे. सर्वांना CBSE इयत्ता 10वी निकाल 2022 चे लाइव्ह अपडेट येथे तपासण्याचा सल्ला दिला जातो. नव्याने लाँच करण्यात आलेले परिक्षा संगम डिजिटल पोर्टल CBSE इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे 10वी टर्म 2 बोर्ड परीक्षेचे निकाल सहज तपासण्यास मदत करेल.

CBSE 10वी टर्म 2 निकाल 2022: परिक्षा संगम पोर्टलवर तपासा

 1. parikshasangam.cbse.gov.in या वेबसाइटवर जा.
 2. ‘शाळा’ लिंकवर क्लिक करा.
 3. नवीन पेज उघडल्यावर ‘Examination Activity’ वर क्लिक करा.
 4. त्यानंतर Theory Marks Upload वर क्लिक करा.
 5. निकाल जाहीर झाल्यानंतर तुमचे गुण दिसून येतील.
 6. निकाल तपासा, डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

उमेदवार मोबाईल Application UMANG आणि DigiLocker वरून CBSE इयत्ता 10वी टर्म 2 चा निकाल 2022 तपासू शकतील आणि CBSE 10वी टर्म 2 चा निकाल SMS सेवेद्वारे देखील उपलब्ध असेल. या वर्षी 35 लाख विद्यार्थ्यांनी CBSE इयत्ता 10वीची परीक्षा 2022 ला दिली होती.

असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, सीबीएसई बोर्ड 4 जुलै रोजी निकाल जाहीर करू शकेल, जरी याबाबत अधिकाऱ्यांकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या निकालांसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवले पाहिजे आणि टाइम्स नाऊ मराठीशी देखील कनेक्ट रहावे जेथे CBSE परीक्षांशी संबंधित नवीनत अपडेट्स देण्यात येतील.

CBSE 10th Result: दहावीचा निकाल कधी? जाणून घ्या महत्वाची अपडेट

CBSE 10th Result 2022: सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालाच्या घोषणेची लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. यापूर्वी, सीबीएसई निकाल २०२२ जून महिन्यात प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा होती. ताज्या अहवालानुसार, सीबीएसई दहावी-बारावीचा निकाल जुलैमध्ये जाहीर केला जाईल. सूत्रांनी तात्पुरत्या तारखाही जाहीर केल्या आहेत. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरील अपडेटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल
आत्तापर्यंत सीबीएसई दहावी निकाल २०२२ आणि सीबीएसई बारावी निकालाच्या घोषणेबद्दल कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. दरम्यान सीबीएसई दहावी टर्म-२ चा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. ४ जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर बारावी बोर्ड टर्म-२ चा निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. बारावीचा निकाल १४ किंवा १५ जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे.

टर्म-१ आणि टर्म-२ चे वेटेज ठरणे बाकी
इयत्ता दहावीची मूल्यमापन प्रक्रिया संपली आहे. काही केंद्रांवर बारावीची मूल्यांकन प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्याचवेळी टर्म-१ आणि टर्म-२ चे वेटेज अजून ठरवायचे असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. इयत्ता दहावीचा निकाल ४ जुलै २०२२ पर्यंत आणि बारावीचा निकाल १४ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

CBSE Results 2022: सीबीएसईने लॉन्च केले ‘परीक्षा संगम’ टॅब; परीक्षांची सर्व माहिती एका पोर्टलवर

CBSE Results 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अर्थात सीबीएसईने आपल्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर एक नवा टॅब लॉन्च केले आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार नवा टॅब – परीक्षा संगम ( Pariksha Sangam), सर्व परीक्षाविषयक घडामोडींसाठी एक व्यापक वन-स्टॉप पोर्टल आहे. परीक्षा संगम पोर्टल Parikshasangam.cbse.gov.in चे तीन विभाग आहेत. स्कूल (Ganga), रीजनल ऑफिस (Yamuna) आणि हेड ऑफिस (Saraswati). हे नवे परीक्षा संगम टॅब cbse.gov.in – मुख्य वेबसाइट, SARAS,निकाल और शैक्षणिक वेबसाइटमध्ये आधीच असलेल्या टॅबव्यतिरिक्त आहे.

परीक्षा संगम पोर्टल

स्कूल सेक्शन अंतर्गत परीक्षा संदर्भ साहित्य, परीक्षेपूर्वीच्या घडामोडी, परीक्षेच्या वेळची अद्ययावत माहिती, स्कूल डिजीलॉकर आणि परीक्षेनंतरच्या घडामोडी आणि एकखिडकी पेमेंट प्रणाली उपलब्ध केली आहे. रिजनल ऑफिस सेक्शनअंतर्गत परीक्षेचे संदर्भ साहित्य उपलब्ध केले आहे. यासह ड्युप्लिकेट अॅकॅडमिक कागदपत्रे आणि डिजीलॉकर अॅक्सेस उपलब्ध करण्यात आला आहे.

सीबीएसई निकालाची लवकरच घोषणा

सीबीएसई इयत्ता दहावी आणि बारावीच्या टर्म २ परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. बोर्डाचा निकाल सीबीएसईची वेबसाइट Cbseresults.nic.in वर घोषित केला जाणार आहे. यावर्षी बोर्डाने शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी दोन टप्प्यांमध्ये परीक्षेचे आयोजन केले होते. सीबीएसई बोर्डाचा टर्म २ परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे.

92522187

रिझल्ट वेबसाइट सह डिजिलॉकर वर उपलब्ध असेल

सीबीएसई टर्म २ निकालाची गुणपत्रिका मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी cbseresults.nic.in, digilocker.gov.in किंवा results.gov.in या संकेतस्थळांना भेट देऊ शकतात. सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल स्कोअरकार्ड डाउनलोड आणि अॅक्सेस करण्यासाठी विद्यार्थी आपला रोल नंबर आणि शाळा क्रमांकाचा वापर करू शकतात.

92538419

92591680

CBSE 10th Result 2022 : cbresults.nic.in वर आज जाहीर होणार CBSE दहावीचा निकाल?

CBSE 10th Result 2022 Date : CBSE दहावी आणि बारावीचे निकाल कधी जाहीर होणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे.

CBSE 10th Result 2022 Date : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र बोर्डाचे इयत्ता दहावीचे निकाल जाहीर करण्यात आले. अशातच अद्याप केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) चे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सीबीएसई बोर्डाचे निकाल कधी लागणार? हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) आज, 04 जुलै 2022 रोजी CBSE 10वी टर्म 2 बोर्ड परीक्षा 2022 चा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. CBSE मॅट्रिक टर्म 2 परीक्षेत बसलेले विद्यार्थी त्यांच्या रोल नंबरच्या मदतीनं CBSE निकाल तपासू शकतात.  

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसई 15 जुलैपर्यंत सीबीएसई दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करु शकतं. दहावीचा निकाल बारावीपूर्वी जाहीर होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॅट्रिकचा निकाल 04 जुलै रोजी घोषित केला जाण्याची शक्यता आहे. दहावी किंवा बारावी निकालाच्या तारखेबद्दल सीबीएसईकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. निकालाच्या तारखेचा मागील पॅटर्न बोर्डानं पाहिल्यास, सीबीएसई निकाल जाहीर होण्याच्या दोन किंवा तीन तास आधी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करतं. 

CBSE निकाल 2022 कुठे पाहाल? 

CBSE कडून त्यांची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbresults.nic.in वर निकाल जाहीर करेल. याशिवाय विद्यार्थी डिजीलॉक वेबसाइट किंवा अॅप, उमंग अॅप आणि results.gov.in वर दहावी, बारावीचे निकाल पाहू शकतात. 

यावर्षी, सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आतुरतेनं वाट पाहत आहेत. यावर्षी सीबीएसईनं 26 एप्रिल ते 24 मे दरम्यान दहावीची परीक्षा घेतली होती. त्याचवेळी बोर्डातर्फे 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत बारावी वर्गाची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. यापैकी 21 लाख विद्यार्थ्यांनी दहावी तर 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. 

कसा पाहाल निकाल? 

 • सर्वात आधी विद्यार्थ्यांनी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.gov.incbresults.nic.in भेट द्यावी
 • त्यानंतर इयत्ता दहावी, बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. 
 • आता विद्यार्थ्यांनी आपला रजिस्ट्रेशन नंबर/ रोल नंबर टाकावा. 
 • त्यानंतर विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचा निकाल स्क्रिनवर दिसेल. 
 • खाली दिलेल्या डाऊनलोड पर्यायावर क्लिक करुन विद्यार्थी त्यांची गुणपत्रिका डाऊनलोक करु शकतात. 
 • निकालाची प्रिंटआउट काढा. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Leave a Reply

Your email address will not be published.